Central Railway: मध्य रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये 'या' तारखेपासून बदल; चक्क 15 दिवसांचा ब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक

Central Railway: मध्य रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये 'या' तारखेपासून बदल; चक्क 15 दिवसांचा ब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक

मुंबई लोकल ही शहराची लाईफ लाईन आहे. त्याच्या वेळापत्रकावर अनेकांचं दिवसभरातील कामं अवलंबून असतात.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

मुंबई लोकल ही शहराची लाईफ लाईन आहे. त्याच्या वेळापत्रकावर अनेकांचं दिवसभरातील कामं अवलंबून असतात. फलाट विस्तारासाठी मध्य रेल्वेवर 15 दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. आता या वेळापत्रकामध्ये झालेले बदलही महत्त्वाचे आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून मुंबई लोकलच्या वेळापत्रकामध्ये बदल होणार असल्याचं म्हटलं आहे. 5 ऑक्टोबर पासून हे बदल होणार आहेत. आजपासून हा ब्लॉक सुरू होणार असल्याने प्रवाशांनी प्रवासापूर्वी अपडेटेड वेळापत्रक जाणून घ्या.

सीएसएमटी स्थानकामधील 10 अप आणि 10 डाऊन मुंबई लोकल मध्ये हे बदल होणार आहेत. 5 ऑक्टोबर पासून या लोकलची सुरूवात आणि शेवट दादर स्थानकामध्ये होणार आहे.

पुढील 15 दिवसांसाठी होणारे बदल

1. रात्री 12.14 वाजताची CSMT-कसारा लोकल शेवटची असेल.

2. ब्लॉकदरम्यान CSMT-भायखळा लोकल सेवा बंद राहिल.

3. रात्री 9.43 वाजताची कर्जत-CSMT लोकल कल्याणहून रात्री 10.34 वाजता CSMT कडे जाणारी शेवटची लोकल

4. ठाण्याहून पहाटे CSMT कडे जाणारी पहिली लोकल 4 वाजता असेल.

5. पहिली CSMT-कर्जत लोकल पहाटे 4.47 वाजता सुटेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com