चंद्रकात पाटील राज ठाकरेंच्या भेटीला, नव्या राजकीय समीकरणांची नांदी?
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. ही भेट सदिच्छा असल्याचं पाटील यांनी सांगितलंय. याआधीही दोन्ही नेत्यांनी दौऱ्यामध्ये असताना नाशिकमध्ये एकमेकांची भेट घेतली होती. आता पुन्हा एकदा दोन्ही नेत्यांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
चंद्रकांत पाटील यांनी संबंधित भेटीबाबत महत्वाचं विधान केलं आहे. भाजपा आणि मनसेची युती होण्याची शक्यता नाहीय, असे ते म्हणाले. यामागील मुख्य कारण म्हणजे मनसेचे इतर राज्यांबद्दलचे विचार आम्हाला मान्य नाहीत. मात्र मतभेद असले तरी एकमेकांच्या भेटीगाठी घेणं महत्वाचं असतं म्हणून मी उद्या राज ठाकरेंची भेट घेणार आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी स्पष्ट केलं.
त्यामुळेच आज राज ठाकरेंसोबत होणाऱ्या भेटीमध्ये भाजपा आणि मनसेदरम्यानच्या युतीबद्दल चर्चा होणार असल्याचे स्पष्ट संकेत पाटील यांनी दिले आहेत.