‘राज ठाकरे आश्वासक चेहरा’, चंद्रकांत पाटलांचा मनसे-भाजप युतीला दुजोरा?
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची नाशिकमध्ये भेट झाली. राज ठाकरे मागील दोन दिवसांपासून नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. महानगरपालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे नाशकात मोर्चेबांधणी करत असल्याची चर्चा आहे. चंद्रकात पाटील यांनी देखील आज नाशकात भाजपाच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली.
यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी राज ठाकरे यांच्यावर स्तुतीसुनने उधळली. राज ठाकरे हा आश्वासक चेहरा असल्याचं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलंय. याआधीपासूनच नाशिकच्या मनपा निवडणुकांमध्ये मनसे आणि भाजपा एकत्र येणार असल्याच्या चर्चा होत्या. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे त्याला आणखी खतपाणी मिळालं आहे.
चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतर राज ठाकरे आणि मी खूप जुने मित्र आहोत, असे पाटील म्हणाले. आम्ही दोघेही विद्यार्थी चळवळीतील आहोत. मी निघालो तेवढ्यात त्यांच्या गाड्या दिसल्या. त्यांना मी नमस्कार केला. बाकी काही नाही. आमच्यात दहा-पंधरा मिनिटं चर्चा झाली हे खरं आहे. पण दोन तास चर्चा होण्याइतपत आमचे संबंध आहेत. आजच्या भेटीत फक्त हाय, हॅलोच झालं, असं पाटील यांनी सांगितलं.