भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तीन दिवसांच्या अमरावती दौऱ्यावर

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तीन दिवसांच्या अमरावती दौऱ्यावर

Published by :
Published on

भाजपाचे नेते तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील हे आजपासून तीन दिवसांच्या अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. जवळपास पाच तालुक्यांमधील पदाधिकाऱ्यांच्या ते भेटी घेणार आहे .चंद्रकांत पाटील यांनी आज वरुड मध्ये या दौऱ्याला सुरुवात केली.

वरुड येथे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांच्या मतदार संघात आज दिवसभर कार्यक्रम आहेत. या दौऱ्या दरम्यान पदाधिकाऱ्यांच्या भेटी पक्षाची मोट बांधणी तसेच अनेक पदाधिकाऱ्यांचे प्रवेश सुद्धा पक्षात करून घेतले जाणार आहे.

सोबतच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची ही चर्चा करण्याची शक्यता आहे. दरम्यान या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची गर्दी उसळली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com