Maharashtra Rain
Maharashtra Rain

राज्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता

पावसासोबत प्रचंड उष्मा, ढगाळ वातावरण असा तिहेरी फटका बसण्याची शक्यता आहे.
Published by :
Published on

येत्या ४ दिवसांत राज्यात अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाची (rain in maharashtra) शक्यता हवामान विभागाकडून (Meteorological Department) वर्तवण्यात आली आहे. पावसासोबत प्रचंड उष्मा, ढगाळ वातावरण असा तिहेरी फटका बसण्याची शक्यता आहे.

कोकणतील सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह आसपासच्या भागात वादळीवारे आणि विजांच्या कडकडाटासह पुढील चार दिवस पावसाची शक्यता (rain in maharashtra) वर्तविण्यात आली आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात प्रचंड उष्म्यासह बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तविला आहे.

या जिल्ह्यात पावसाचा अंदाज

राज्यात पुढील दोन ते तीन दिवस काही भागांत पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आदी जिल्ह्यांत पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता आहे. परिणामी दिवसाचे कमाल तापमान किंचित कमी होणार असले, तरी किमान तापमानात वाढ होऊन रात्रीचा उकाडा वाढण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com