CET परीक्षांच्या तारखा जाहीर;उदय सामंतांनी ट्विट करून दिली माहिती

CET परीक्षांच्या तारखा जाहीर;उदय सामंतांनी ट्विट करून दिली माहिती

Published by :
Published on

सीईटी परीक्षेच्या तारखा (CET Exam Dates) जाहीर करण्यात आल्या आहेत. मंत्री उदय सामंत यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. राज्य सीईटी कक्षामार्फत उच्च शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा दि.03 जून ते 10 जून, 2022 रोजी होणार आहेत. तंत्र शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा दि.11 जून ते 28 जून, 2022 तसेच कला शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा दि.12 जून, 2022 रोजी घेण्यात येणार आहेत, असं उदय सामंत यांनी सांगितलं आहे.

उच्च शिक्षण विभागाचे विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षाचे ऑनलाईन अर्ज नोंदणी 19 मार्च, 2022 ते 12 एप्रिल, 2022 पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. तसेच सीईटी परीक्षा अंदाजे दिनांक 03 जून, 2022 ते 10 जून, 2022 या कालावधीत घेण्यात येणार आहे.

तंत्रशिक्षणांतर्गत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षाचे ऑनलाईन अर्ज नोंदणी 10 फेब्रुवारी 2022 ते 15 एप्रिल 2022 पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. तसेच संबंधीत सामाईक प्रवेश परीक्षा अंदाजे दिनांक 11 जून 2022 ते 28 जून2022 या कालावधीत घेण्यात येणार आहेत. तसेच कला शिक्षण विभागांतर्गत घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षा 12 जून, 2022 रोजी घेण्यात येणार आहे. सर्व संबंधीत उमेदवारांना आवाहन करण्यात येते की, नमूद कालावधीत आपले अर्ज सादर करुन परीक्षा द्यावी, असं आवाहन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून करण्यात आलं आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता राज्य सीईटी कक्षामार्फत उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता सामाईक प्रवेश परीक्षांचे ऑनलाईन नोंदणी अर्ज स्वीकृती सुरु करण्यात आलेली आहे. अभ्यासक्रमनिहाय सीईटी परीक्षांचे माहिती पुस्तिका, वेळापत्रक आणि अभ्यासक्रम राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर www.mahacet.org उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com