Central Railway; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची घटना घडली आहे. वाशिंदजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने हा वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे आता प्रवाशांना रेल्वे स्थानकावर ताटकळत उभे रहावे लागत आहे.रेल्वे प्रशासन तांत्रिक बाब सोडवण्याचा प्रयत्न करत आहे.
रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने मागून येणाऱ्या दोन मेल- एक्स्प्रेस गाड्या आणि एक लोकल अडकडून पडली आहे. तसेच ३ वाजून २३ मिनिटांची ठाण्यावरून येणारी आसनगांव कल्याण स्थानकात रद्द करण्यात आली आहे. मात्र, या घटनेमुळे लोकलचे बंचिग काढण्यासाठी काही लोकल फेर्या रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे चाकरमान्यासह प्रवाशांना चागंलाच मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. लोकल सेवा ठप्प झाल्याने मध्य रेल्वे मार्गवरील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली होती. तसेच अनेक प्रवाशांनी लोकलमधून उतरून पुढचे रेल्वे स्थानकावर रेल्वे रुळावरून पायी जात असल्याचे चित्र दिसून आले आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या खडवली ते वाशिंद रेल्वे स्थानकादरम्यान दुपारी ३ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास लोकलच्या ओव्हर हेड वायरमध्ये पेंटाग्राफ अडकल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे लोकलमधील विद्युत पुरवठा खंडित झालेला होता. या घटनेची माहिती मिळाला मध्य रेल्वेचे अभियांत्रीकी पथक घटना स्थळी पोहचलेले आहे. बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरु आहे.