केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले...

केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले...

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. आज दुपारी 3.30वाजता या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुका जाहीर होणार आहे

आजच निवडणुकांची घोषणा होणार असून आजपासून आचारसंहिता लागणार आहे. निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करणार असून निवडणुकांच्या तारखांच्या घोषणा होणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकर म्हणाले की, आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेण्याचे ठरवलं आहे. या पत्रकार परिषदेत कदाचित महाराष्ट्रातल्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांचे वेळापत्रकही जाहीर केलं जाईल. तसं झालं तर राज्यात लगेच आचारसंहिताही लागू होईल. 26 नोव्हेंबरला सध्याच्या विधानसभेची टर्म संपते आहे आणि ती संपण्यापूर्वी मला वाटतं निवडणूक घेण्यात येईल. असे राहुल नार्वेकर म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com