भारतात कोरोना काळात ४० लाख अतिरिक्त मृत्यू?

भारतात कोरोना काळात ४० लाख अतिरिक्त मृत्यू?

Published by :
Published on

अमेरिकास्थित 'सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेन्ट' संस्थेने अहवाल तयार केला आहे. यानुसार भारतात कोरोना काळात जवळपास ४० लाख व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. कोरोनासह अन्य आजारांनी ग्रस्त व्यक्तींचा देखील मृत्यू झाल्याची शक्यता यामध्ये वर्तवण्यात आली आहे.

देशातील कोरोनाबळींची अधिकृत संख्या ४,१४,००० आहे. मात्र, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत करोनाकाळात देशात ४० लाखांहून अधिक अतिरिक्त मृत्यू झाल्याचा अंदाज ताज्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. या सर्वांचाच करोनामुळे मृत्यू झाल्याचा निष्कर्ष काढता येणार नसला तरी करोनाने मृत्यूच्या सरकारी आकड्यापेक्षा अनेक पटींनी बळी घेतल्याचे संकेत या अहवालातून मिळाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com