अनिल देशमुखांच्या प्रकरणात ‘सीबीआय’चा मोठा खुलासा

अनिल देशमुखांच्या प्रकरणात ‘सीबीआय’चा मोठा खुलासा

Published by :
Published on

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची १०० कोटींच्या वसूली प्रकरणात चौकशी सुरू असतानाच त्यांना क्लिनचिट मिळाल्यासंदर्भात कागद सोशल मीडियावर फिरत आहेत. यानंतर सीबीआयने मोठा खुलासा केलाय.

१०० कोटी रुपयांच्या वसूलीच्या आरोपातून त्यांना सीबीआयकडून क्लिनचिट मिळाल्याची माहिती संबंधित कागदपत्रांमध्ये आहे. दरम्यान, या कागदपत्रांच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना आता मोठी माहिती समोर आली आहे.

क्लीन चीट दिल्याच्या अहवालावर सीबीआयने स्पष्टीकरण दिलं आहे. पुराव्यांनुसार अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल आहे आणि या प्रकरणी अद्याप तपास सुरू असल्याची माहिती यामध्ये समोर आली आहे.

केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) कडून आलेल्या एका पत्रात असे उघड झाले आहे की, काँग्रेसच्या दाव्याप्रमाणे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना प्राथमिक तपासात क्लीन चिट देण्यात आली नव्हती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com