PAN-Aadhaar लिंक करण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढली
भारत सरकारने आधार कार्डला पॅन कार्डशी जोडण्याची मुदत पुन्हा वाढवली आहे. त्यानुसार तुम्ही तुमचे पॅन कार्डआधार कार्डशी31 मार्च 2022 पर्यंत लिंक करू शकता. मात्र 31 मार्च 2022 पर्यंत जे पॅन-आधार लिंक करणार नाहीत त्यांच्यावर दंड आकारण्याची कारवाई केली जाऊ शकते. आयकर विभागाने नवीन अधिसूचना जारी करताना याबाबत माहिती शेअर केली आहे.
पॅन-आधार जोडण्याची प्रक्रिया जाणून घ्या :
● सर्वप्रथम www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटला भेट द्या.
● येथे तुम्हाला 'लिंक आधार' चा पर्याय दिसेल.
● या लिंकवर क्लिक करा तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल.
● येथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक, पॅन कार्ड क्रमांक आणि तुमची काही वैयक्तिक माहिती भरावी लागेल.
● यानंतर, 'सबमिट'च्या बटणावर क्लिक करताच तुमचे पॅन कार्ड तुमच्या आधारशी लिंक होईल.
पॅन-आधार लिंक नाही केले तर काय होणार? :
● तुमचे पॅन कार्ड 31 मार्च 2022 नंतर निष्क्रिय केले जाईल.
● यानंतर, तुम्हाला ना बँक खाते उघडता येणार आहे.
● तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात.
● तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळू शकणार नाही.
● आयकर कायद्यांतर्गत कलम 272B चे उल्लंघन मानले जाईल.
● पॅन धारकाला 10,000 रुपये दंड भरावा लागेल.