गटाराच्या चेंबरमध्ये ॲक्टिवासह कार घुसली; ठेकेदारावर कारवाईची मागणी
भूपेश बारंगे | वर्ध्यात पावसाळ्यापूर्वी रस्त्यावरील गटारासंबधित संपूर्ण काम करण्याचे आदेश असताना देखील काही ठेकेदारांची कामे अपूर्ण राहिली आहेत. या अपूर्ण कामांचा मनस्ताप सामान्यांना सोसावा लागतोय. गटर लाईनच्या कामामुळे कार आणि दुचाकीच्या अपघाताची घडना घडली आहे.
वर्धा शहरात अमृत महोत्सव योजनेअंतर्गत शहरातील विविध भागांमध्ये गटर लाईनचे काम सुरू आहे. परंतु हे काम अपूर्ण राहिल्याने व ठेकेदाराने कुठेलेही फलक न लावल्याने शहरातील पोलिस स्टेशन समोर एक्टिवा गाडी सह चार चाकी वाहन गटाच्या चेंबर मध्ये जाऊन आदळल्याची घटना घडली. मात्र दैव बलवत्तर म्हणून कार चालक बचावला असून त्याला गंभीर इजा झाली. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही आहे मात्र वित्तहानी झाली आहे.
दरम्यान अशा प्रकरणात नगर परिषद प्रशासनाला आता तरी जाग येईल का? की एखाद्या वाहन चालकाला आपला जीव गमवावा लागेल तरच जाग येणार.संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.