Anil Parab | समितीचा विलिनीकरणाबाबतचा सकारात्मक अहवाल आला, तर….

Anil Parab | समितीचा विलिनीकरणाबाबतचा सकारात्मक अहवाल आला, तर….

Published by :
Published on

मी माझ्याकडून सर्व प्रयत्न केलेले आहेत. आमची कामगारांना एकच विनंती आहे. एखादी गोष्ट न्यायप्रविष्ठ असतान आडमुठे धोरण स्वीकारून कृपया हा संप अधिक वाढवू नये असे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले.

राज्यात मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे.या पार्श्वभूमीवर आज(शनिवार) सह्याद्री अतिथीगृहावर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबतची बैठक झाली. परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळ यांच्यात ही बैठक पार पडली. त्यानंतर अनिल परब यांनी माध्यमांशी बोलत होते.

"समितीचा अहवाल जर लवकर देता आला तर तो देण्याचा आमचा प्रयत्न राहील. समितीचा जर विलिनीकरणाबाबतचा सकारात्मक अहवाल आला, तर शासन तो मंजूर करेल. परंतु जर समितीने नकारात्मक अहवाल दिला तर काय करायचं? यावरती देखील त्यांच्याशी चर्चा झाली. "त्यांच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या, त्याबाबत शासानाने सकारात्मक विचार ठेवलेला आहे. आता कामगारांशी चर्चेसाठी ते(कामगारांचं शिष्टमंडळ) गेलेले आहेत आणि कामगारांशी चर्चा करून पुन्हा एकदा भेटण्याची त्यांनी तयारी दाखवली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com