MPSC
MPSCteam lokshahi

MPSC परीक्षेबाबत मोठी बातमी, उमेदवारांचा होणार मोठा फायदा..!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या उमेदवारांचे प्रयत्न/ संधींची संख्या मर्यादित करण्याचा निर्णय रद्द करण्यात येत आहे.
Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. दरम्यान विविध शासकीय पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) तर्फे परीक्षा घेतल्या जातात. या प्रक्रियेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची नियुक्ती करण्याबाबत ‘एमपीएससी’मार्फत शासनाला शिफारस केली जाते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2020 मध्ये परीक्षेसाठी उमेदवारांना दिल्या जाणाऱ्या कमाल संधीबाबत मोठा निर्णय घेतला होता. यामध्ये खुल्या गटातील (अराखीव) उमेदवारांना कमाल 6 संधी, इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना कमाल 9 संधी, तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उमेदवारांना कमाल संधीची मर्यादा लागू राहणार नसल्याचे जाहीर केले होते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) धर्तीवर ‘एमपीएससी’ने हा निर्णय घेतला होता. मात्र, आता त्यात फेरबदल करण्यात आला असून, उमेदवारांच्या कमाल संधींची मर्यादा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे ‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या उमेदवारांना आता पूर्वीप्रमाणेच प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या वयोमर्यादेनुसार कितीही वेळा परीक्षा देता येणार आहे.

MPSC
Phone Tapping Case : फोन टॅपिंग प्रकरणी आता मलिकांची होणार चौकशी

पूर्वी होता हा नियम...

‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या उमेदवाराला दिलेल्या वयोमर्यादेत कितीही वेळा परीक्षा देता येत होती. त्यामुळे वयाचा निकष संपेपर्यंत उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देत. या परीक्षांमध्ये वारंवार अपयश आले, तरी ते 5 वर्षे तयारी करीत..

‘एमपीएससी’ परीक्षेसाठी दिल्या जाणाऱ्या संधीबाबत काही मर्यादा निश्‍चित करण्याची मागणी होत होती. त्याची दखल घेत आयोगाने ‘युपीएससी’च्या धर्तीवर ‘एमपीएससी’ परीक्षेसाठी 2021 पासून कमाल संधीची मर्यादा घालून दिली होती. मात्र, आता त्यात पुन्हा एकदा फेरबदल करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com