राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक; ‘या’ विषयांवर चर्चा होण्याची शक्यता

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक; ‘या’ विषयांवर चर्चा होण्याची शक्यता

Published by :
Published on

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. आज दुपारी साडेबारा वाजता बैठकीला सुरुवात होईल. महाविकास आघाडी सरकारमधील सर्व खात्यांचे मंत्री बैठकीला उपस्थित असणार आहेत. दरम्यान, या बैठकीत काय निर्णय होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

निर्बंध वाढणार का?

सध्या राज्यात कडक निर्बंध लागू आहेत. ३० एप्रिलपर्यंत हे निर्बंध लागू असतील. मात्र, अद्याप कोरोना रुग्णांचा आकडा आटोक्यात आलेला नाही. त्यामुळे राज्यातील लॉकडाउनसंदर्भात किंवा निर्बंध वाढवण्यासंदर्भात या बैठकीत निर्णय होऊ शकतो.

लसीकरणाचं काय?

देशभरात १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्याचं केंद्र सरकारनं जाहीर केलं होतं. मात्र, राज्यात सध्या लसींचा तुटवडा आहे, याची कबुली थेट राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनीच दिली आहे. त्यामुळे १ मेनंतरचं लसीकरण कसं असणार, सर्वांना मोफत लस दिली जाईल, यासंदर्भात बैठकीत सविस्तर चर्चा होईल. बैठकीनंतर मुख्यमंत्री आपला निर्णय जाहीर करू शकतात.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com