महाराष्ट्र
घरफोडी करणारी टोळी जेरबंद, पुण्याच्या गुन्हे शाखेची कारवाई
शिरूर शहरात आदिनाथनगर या ठिकाणी घर बंद असल्याच्या संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी दिवसा घरफोडी केली. यात एकूण दहा लाख पंधरा हजार रुपयांचे, एकोणतीस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरी गेले होते.
या प्रकाराबाबत संगीता संतोष शेवाळे यांनी शिरूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण यांनी किशोर तेजराज वायाळ याच्या टोळीने केला असल्याची बातमी मिळाल्याने टोळीची माहिती काढत असताना टोळीचा म्होरक्या त्याच्या साथीदारासह शिरूर परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी किशोरसह अन्य साथीदारांना सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले.