स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; एमपीएससीकडून बंपर पदभरती
राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं तब्बल आठ हजार 169 पदांसाठी जाहिरात काढली आहे. आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र अराजपात्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधून पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे या वर्षातील सर्वात मोठी भरती एमपीएससीने जाहीर केली आहे. त्यामुळे आनंदाची वातावरण विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाले आहे.
एमपीएससी अंतर्गत होण्याऱ्या महाराष्ट्र राज्यपात्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त परीक्षा 2023 ही 30 एप्रिल 2023 रोजी होणार आहे. महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रावर परीक्षा घेतली जाणार आहे. तर महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2 सप्टेंबर 2023 रोजी तर महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2023 शनिवारी 9 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधून भरावयाच्या एकूण 8,169 पदांच्या भरतीकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात(क्रमांक 01/2023) प्रसिद्ध करण्यात आली आहे.