सांगलीत बैलगाडा-छकडा शर्यतीची जोरदार तयारी, कोर्टाच्या विरोधात शेतकरी?

सांगलीत बैलगाडा-छकडा शर्यतीची जोरदार तयारी, कोर्टाच्या विरोधात शेतकरी?

Published by :
Published on

महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीवर बंदी असल्याने शेतकऱ्यांची सर्जा-राजा कुठेतरी कालवश होत चालला आहे. या शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. अनेक शेतकरी नेत्यांनी देखील यासाठी लढा उभारलाय.

काही ठिकाणी विनापरवाना शर्यती भरवल्याने पोलिसांनी आयोजकांवरच कारवाई केलीय. तर आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडी शर्यतीसाठी कंबर कसल्याचं चित्र आहे. परवानगी नाही मिळाली तरी सुद्धा शर्यत होणारच असा निश्चय करून सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील झरेमध्ये जोरदार तयारी सुरू केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com