महाराष्ट्र
माती खाली अडकलेल्या ‘त्या’ मुलाचा मृतदेह सापडला
समीर महाडेश्वर । सिंधुदुर्ग जिल्ह्यात डोंगर खचून माती खाली अडकलेल्या मुलाचा मृतदेह अखेर सापडला आहे. गीतेश गावडे असे युवकाचे नाव आहे. तब्बल सात दिवस सुरु असलेल्या शोधमोहिमेला आज यश आले. तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी हि माहिती दिली.
गाळेल येथे डोंगर खचल्याची घटना घडली होती. या माती खाली अडकलेल्या वेंगुर्लेतील गीतेश गावडे युवकाचा मृतदेह आज मिळाला. गेले सात दिवसापासून त्या ठिकाणी पाच पोकलेनच्या साह्याने मदत कार्य सुरू होते. आज या शोधकार्यात त्यांना यश आले आहे. याबाबतची माहिती तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली.