मुंबईकरांना दिलासा! पाणीकपातीबाबत बीएमसीचा मोठा निर्णय

मुंबईकरांना दिलासा! पाणीकपातीबाबत बीएमसीचा मोठा निर्णय

मुंबई आणि उपनगरांत पावसाने जोरदार बॅटींग केली आहे. यामुळे धरणं, नदी, नाले तुडुंब भरले असून पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे
Published on

मुंबई : राज्यात उशिराने दाखल झालेल्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई आणि उपनगरांतही पावसाने जोरदार बॅटींग केली आहे. यामुळे धरणं, नदी, नाले तुडुंब भरले असून पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच, मुंबईला पाणीपुरवठा करणारे सातही तलाव तुडुंब भरले आहेत. यामुळे मुंबईवरील पाणीकपात आता मागे घेण्यात येणार आहे.

मुंबईकरांना दिलासा! पाणीकपातीबाबत बीएमसीचा मोठा निर्णय
मुंबई-नाशिक महामार्गाच्या कामाला गती द्या; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

यंदा पावसाळ्यास बराच विलंब झाला असून महाराष्‍ट्रात पावसाचे उशिरा आगमन झालेले आहे. मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये दमदार पावसाअभावी पुरेसा पाणीसाठा नसल्याने शनिवार १ जुलैपासून संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर मुसळधार पावसाने हजेरी लावत मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटवली आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणारे सातही तलाव भरले असल्याने बीएमसीने पाणीकपात मागे घेण्य़ाचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील पाणीकपात पुढील आठवड्यापासून रद्द करण्यात येणार आहे. यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, राज्यात उद्यापासून मान्सूनची तीव्रता कमी होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. दक्षिण ओरिसा भागात असलेल्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली असून राज्यावरचा कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे स्थित आहे. यामुळे राज्यात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे. १ ऑगस्टपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी पाऊस होणार आहे. तर, पुण्यात पुढचे काही दिवस ढगाळ हवामान राहील.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com