BMC Election 2022 : मुंबईत यशवंत जाधव यांना धक्का, पाहा कोणाच्या वार्डात काय झाले?
मुंबई महापालिकेच्या (bmc) निवडणुकीची आरक्षण (reservation) सोडत आज जाहीर झाली. आपला मतदारसंघ सुरक्षित राहण्यासाठी अनेक इच्छुकांनी देव पाण्यात टाकले होते. मात्र काही नगरसेवकांचे मतदारसंघ सुरक्षित राहिले आहेत. तर काहींचे वॉर्ड आरक्षित झाल्याने त्यांची प्रचंड गोची झाली आहे. शिवसेनेचे (shivsena) माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, शिवसेनेचे नगरसेवक समाधान सरवणकर, अनिल पाटणकर, काँग्रेसचे नगरसेवक अशरफ आजमी आणि भाजपचे नगरसेवक आकाश पुरोहित तसेच ज्योती अळवणी यांचे मतदारसंघ आरक्षित झाले आहेत. आता या नगरसेवकांना आता नवीन वॉर्ड शोधावे लागणार आहेत. मात्र, आधीच त्या मतदारसंघात असलेले नगरसेवक इतरांना जागा सोडतील काय? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पेडणेकर दिलासा तर यशवंत जाधव यांना धक्का
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना आरक्षण सोडतीत दिलासा मिळाला आहे. त्यांचा प्रभाग क्रमांक 206 हा सर्वसाधारण झाला आहे. तर, राष्ट्रवादीच्या माजी गटनेत्या राखी जाधव यांनाही दिलासा मिळाला आहे. त्यांचा वॉर्ड क्रमांक 130 हा महिलांसाठी राखीव झाला आहे
यशवंत जाधव यांचा 217 क्रमांक वार्ड सर्व साधारण महिलासाठी आरक्षित झाला आहे. बेस्टचे माजी अध्यक्ष आशिष चेंबुरकर आणि भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांचे वॉर्ड अनुसूचित जातीसाठी राखीव झाले आहेत. तर, शिवसेना नगरसेवक आरोग्य समिती माजी अध्यक्ष अमेय घोले, काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांचे प्रभाग महिलांसाठी आरक्षित झालेत.
अनुसूचित जातीसाठी राखीव झालेले वॉर्ड
60, 153, 157, 162, 208, 215 आणि 221
अनुसुचित जाती महिलांसाठी राखीव
85, 107, 119, 139, 165, 190, 194, 204
अनुसूचित जमातीसाठी राखीव झालेले वॉर्ड
55 आणि 124 हे दोन वॉर्ड अनुसूचित जमातीसाठी राखीव झालेत
महिलांसाठी 53 वॉर्ड आरक्षित
प्राधान्यक्रम 1 (53 )प्रभाग क्रमांक- 2, 10, 21, 23, 23, 25, 33, 34, 49, 52, 54, 57, 59, 61, 86, 90, 95, 98, 100, 104, 106, 109, 111, 118, 121, 122, 134, 144, 145, 150, 156, 159, 169, 170, 171, 172, 175, 178, 182, 184, 189, 191, 192, 201, 202, 205, 207, 212, 213, 218, 229, 230 आणि 236
प्राधान्य क्रम २ (33) प्रभाग क्रमांक- 5, 28, 29, 39, 45, 46, 64, 67, 69, 74, 80, 92, 103, 120, 125, 131, 142, 147, 151, 163, 168, 177, 181, 186, 187, 196, 220, 225, 226, 227, 231, 233 आणि 234
सर्वसाधारण महीला आरक्षित (23) प्रभाग क्रमांक -44, 102, 79, 11, 50, 154, 155, 75, 160, 81, 88, 99, 137, 217, 146, 188, 148, 96 , 9, 185, 130, 232, 53