Narayan Rane Arrest | यवतमाळमध्ये भाजपचा रास्ता रोको;नारायण राणे यांच्या अटकेचा निषेध
संजय राठोड | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कानाखाली लावण्याचं वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक करण्यात आली आहे. रत्नागिरी पोलिसांनी नारायण राणेंवर अटकेची कारवाई केली. या घटनेनंतर भाजप आक्रमक झाली आहे. यवतमाळमध्ये भाजपने रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. आर्णी मार्गावरील वनवासी मारोती मंदिराजवळ भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन करून अटकेचा निषेध नोंदविला. यावेळी या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.
रत्नागिरी पोलिसांनी राणे यांना अटक करुन त्यांना नाशिक पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलं. त्यानंतर नारायण राणे स्वत: बाहेर पडले आणि आपल्या गाडीत बसले. त्यानंतर नाशिक पोलीस राणेंना घेऊन रत्नागिरी सत्र न्यायालयाकडे निघाले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांना पोलिसांच्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना हटवलं आणि ते राणेंना घेऊन नाशिककडे निघाले.