मंत्र्यांच्या ताफ्याला दाखविले काळे झेंडे! कार्यकर्त्यांना केले स्थानबद्ध

मंत्र्यांच्या ताफ्याला दाखविले काळे झेंडे! कार्यकर्त्यांना केले स्थानबद्ध

Published by :
Published on

भूपेश बारंगे, वर्धा | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोलिस वेलफेयर विभागाच्या निर्माणाधीन पेट्रोलपंप हटविण्यात यावा याकरीता आंबेडकरी अनुयायी आणि संघटनांचा प्रचंड विरोध होत आहे. मात्र याची शासन-प्रशासन कोणतीच दखल घेताना दिसत नसल्याने पेट्रोलपंप हटाव कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी मंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत निषेध केला.

प्रमोद शेंडे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या उद्घाटण सोहळ्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर ,पशुसंवर्धन व पालकमंत्री सुनील केदार ,आमदार रणजित कांबळे यांचा ताफा पुतळ्याचे अनावरण करण्याकरीता जात असताना आंबेडकर कार्यकर्त्यांनी पोलिसांना चकमा देत ताफ्या आडवे होत काळे झेंडे दाखवून मंत्र्यांचा निषेध केला. पालकमंत्री मुर्दाबादच्या घोषणा देत निषेध नोंदविला. यावेळी सेवाग्राम पोलिसांनी कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानबंध करीत नजरकैदेत ठेवले.

आंबेडकरी समाजाने पेट्रोलपंप दुसरीकडे हलविण्याची मागणी केली आहे. याकरीता गेल्या अनेक दिवसापासून मोर्चे, आंदोलने चालूच आहे. मात्र याची कोणतीही दखल शासन प्रशासन घेताना दिसत नाही. त्यामुळे शासन प्रशासनाविरोधात रोष व्यक्त होत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com