Jalyukat Shivar Yojana | भाजपच्या अडचणी वाढणार? जलयुक्त शिवार योजनेची चौकशी सुरू

Jalyukat Shivar Yojana | भाजपच्या अडचणी वाढणार? जलयुक्त शिवार योजनेची चौकशी सुरू

Published by :
Published on

राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांच्या महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या जलयुक्त शिवार योजनेची चौकशी होणार आहे. लाचलुचपत विभाग संबंधित चौकशी करणार आहे. या प्रकरणी, योजनतील अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. जलयुक्त शिवार योजनेवरून भाजप अडचणीत तर नाही ना असा सवाल उपस्थित होतोय.

भाजप सरकार असताना जलयुक्त शिवार योजने अंतर्गत राज्यात अनेक ठिकाणी लहान-मोठी एकूण तेराशे 50 ठिकाणी कामे झाले असून या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा शासनाला संशय आहे.जलयुक्त शिवार योजना अंतर्गत सोलापूर जिल्ह्यामध्ये 80 पेक्षा अधिक ठिकाणी कामे झाली आहेत.सोलापूर सह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जलयुक्त शिवार योजना अंतर्गत झाली आहेत कामे या कामात कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा संशय आहे.

2014 ते 19 पर्यंत राज्यातील जलयुक्त शिवार मोहिमे अंतर्गत झालेला तेराशे पन्नास कामांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चौकशी करत आहे. जलसंधारण विभाग कृषी विभाग आणि वन विभागाच्या अनेक अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. जलयुक्त शिवार योजनेवरून भाजप अडचणीत तर नाही ना असा सवाल उपस्थित होतोय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com