”जाती फोडल्यानंतर गाड्या फोडून पंतप्रधान होण्याचा प्रयत्न”, भाजप आमदाराची जहरी टीका
खालेद नाज | भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेकीची हल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर आता राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यात आता जाती फोडून झाल्या-आता गाड्या फोडून पंतप्रधान होण्याचा प्रयत्न सुरू असल्याची जळजळीत टीका सेलू-जिंतूर विधानसभेच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी केली.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचा सर्वच स्तरातुन निषेध केला जात आहे. विशेषतः भाजप ह्या हल्याला राष्ट्रवादीला जबाबदार धरत आहे. या हल्यामागे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवारच आहे अशी टीका भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी ट्वीटच्या माध्यमातून केली.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांची पंतप्रधान होण्याची इच्छा लपलेली नाही. यावरुनच भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी ही टीका केली आहे. मेघना बोर्डीकर त्यांनी म्हटले की, 'जाती फोडून झाल्या-आता गाड्या फोडून पंतप्रधान होण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. तसेच पडळकर यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीच्या हल्ल्याचा जाहीर निषेध केला.
दरम्यान गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यामुळेच त्यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप भाजपाकडून केला जात आहे.