भाजप आमदार नितेश राणे न्यायालयात शरण

भाजप आमदार नितेश राणे न्यायालयात शरण

Published by :
Published on

सर्वोच्च न्यायालयाने भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आज ते जिल्हा न्यायालयात हजर झाले आहेत. गुरुवारी संतोष परब (Santosh Parab)  यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी नितेश राणे यांचा अटकूपर्व जामीन अर्ज  सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्याचवेळी खालच्या न्यायालयात हजर व्हा, असे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र, आदेशानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे, आज शुक्रवारी नितेश राणे हे न्यायालयात उपस्थित झाले आहेत. नितेश राणे यांनी नियमित जामिनासाठी अर्ज केला आहे.

शिवसेना पदाधिकारी संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणात नितेश राणे यांचे नाव आल्यानंतर ते अडचणीत सापडले आहेत. परब यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप नितेश यांच्यावर करण्यात आला आहे. त्यानंतर या प्रकरणात अटक टाळण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले होते. त्यांना दहा दिवसांत जिल्हा व सत्र न्यायालयात हजर राहून नियमित जामीन अर्ज दाखल करण्यास सांगितले होते. त्यानंतर आजच, शुक्रवारी नितेश राणे हे न्यायालयात हजर झाले आहेत. त्यांनी नियमित जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर सुनावणी सुरू झाली आहे.

अॅड. सतीश माने शिंदे आणि अॅड. संग्राम देसाई हे नितेश राणे यांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडणार आहेत. आमदार राणेंसोबत त्यांचे बंधू निलेश राणे हे देखील न्यायालयात उपस्थित आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com