दबावामुळे रेणू शर्मांकडून बलात्काराची तक्रार मागे, भाजप नेत्या उमा खापरेंचा गौप्यस्फोट

दबावामुळे रेणू शर्मांकडून बलात्काराची तक्रार मागे, भाजप नेत्या उमा खापरेंचा गौप्यस्फोट

Published by :
Published on

लोकशाही न्यूज नेटवर्क | सामाजिक न्यायमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतली आहे. या घटनेनंतर यावर तर्क-वितर्क लढवले जातायत. त्यात भाजप नेत्या उमा खापरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

धनंजय मुंडे यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार रेणू शर्मा यांनी मागे घेतली आहे. कौटुंबिक वादातून मी त्यांच्याविरोधात तक्रार दिली होती. परंतु आता मी ही तक्रार मागे घेते आहे, असं रेणू शर्मा यांनी पोलिसांनी सांगितलं. तशा प्रकारे पोलिसांना तिने लेखी लिहून दिलं आहे. डीसीपी अभिषेक त्रिमूखे यांनी संबंधित तरुणीने तक्रार मागे घेतल्याचं सांगितलं.तक्रार मागे घेतल्याने धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.

अशातच धनंजय मुंडे यांनी तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकल्यानेच त्यांनी तक्रार मागे घेण्याचा निर्णय घेतला, असा गौप्यस्फोट भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा उमा खापरे यांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com