Mumbai Local | ”भाजपाच्या दणक्याने ठाकरे सरकार जागं”

Mumbai Local | ”भाजपाच्या दणक्याने ठाकरे सरकार जागं”

Published by :
Published on

दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना येत्या १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाची मुभा देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. या घोषणेनंतर आता भाजपाच्या दणक्याने ठाकरे सरकारला जाग आली असल्याची टीका भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे.

अतुल भातखळकर आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, १५ ऑगस्टपासून रेल्वेबंदी उठवण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा केली आहे. भाजपाच्या दणक्याने ठाकरे सरकारला जाग आली असे त्यांनी म्हटले आहे. तसेच या घोषणेचा फज्जा उडणार नाही याची काळजी घ्या असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे. दरम्यान उद्या पहिला श्रावणी सोमवार आहे, किमान मंदिरे उघडण्याची घोषणा तरी करायला हवी होती असेही भातखळकर यावेळी म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री काय म्हणाले ?

"अर्थचक्र सुरु ठेवण्यासाठी काही निकष आणि निर्बंध लावून सर्वसामान्य प्रवाशांना लोकलचा प्रवास करण्यास आपण मान्यता देत आहोत. ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरी लस घेऊन 14 दिवस झाले असतील त्यांना आपण 15 ऑगस्ट पासून लोकलमधून प्रवास करता येईल", अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com