वर्ध्यात भाजपाला धक्का; 12 नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार

वर्ध्यात भाजपाला धक्का; 12 नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार

Published by :
Published on

भूपेश भारंगे | राज्यात एकीकडे भाजप-शिवसेनेच्या युतीची चर्चा असताना वर्धा जिल्ह्यात शिवसेनेने भाजप मोठा धक्का दिला आहे. हिंगणघाट नगर परिषदेचे भाजपचे विद्यमान 10 नगरसेवक तर माजी 2 नगरसेवक शिवबंधन बांधणार आहेत. त्यामुळे भाजपला मोठे खिंडार पडणार आहे.

गेली काही वर्षे सातत्याने विदर्भ भाजपचा बालेकिल्ला म्हणून पूढे आला आहे. आज याच विदर्भातील हिंगणघाट नगरपालिकेवर भाजपची सत्ता आहे. याच नगरपालिकेचे उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे यांच्यासह भाजपचे विद्यमान १० नगरसेवक आणि २ माजी नगरसेवक म्हणजे सतिश ढोबे, सुरेश मुंजेवार, भास्कर थावरी, मनोज वाघमारे, नीता ढोबे, निलेश पोगळे, सुनिता पचोरी, संगिता वाघमारे, मनीष देवढे, बंटी वाघमारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार आहेत. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का असेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com