Baba Siddiqui Shot : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांचा अखेर गोळीबारात मृत्यू झाला आहे. बांद्र्यातील झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयावर जवळ बाबा सिद्दीकी यांच्यावर ३ अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला आहे. याच प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे.
हल्लेखोर 2 सप्टेंबरपासून कुर्ल्यात भाड्याने खोली घेऊन रहात होते. या खोलीसाठी महिन्याला 14 हजार भाडं देत होते. आरोपींना हल्ल्याआधी ऍडव्हान्स पेमेंट केलं असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींनी बाबा सिद्दिकींचं घर, कार्यालयाची रेकी केली होती. हल्लेखोरांना एक दिवस आधी पिस्तूल मिळालं होतं. दोन आरोपींच्या चौकशीतून ही माहिती समोर आली आहे.
4 जणांनी मिळून बाबा सिद्धीकी याच्या हत्येची सुपारी घेतली होती. आरोपी प्रत्येकी 50 हजार वाटून घेणार होते. पंजाबमध्ये एका जेलमध्ये असताना आरोपी एकमेकांच्या संपर्कात आले. जेलमध्ये आधीपासून बिष्णोई गॅगचा एक सदस्य होता त्याच्या संपर्कात हे तिघं आले, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, करनैव सिंह आणि धर्मराज कश्यप अशी आरोपींची नावं आहेत. करनैल हरियाणा आणि धर्मराज यूपीचा रहिवाशी असल्याची माहिती दिला आहे. मुंबई क्राईम ब्रांच यूनिट 3 मध्ये दोन आरोपींना ठेवण्यात आलं असून, तिसरा आरोपी अद्याप फरार आहे.