LPG Cylinder: नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा! LPG सिलिंडर 'एवढ्या' रुपयांनी स्वस्त
देशात 2024 च्या लोकसभा निवडणुका होणार आहेत आणि त्याआधी एलपीजीच्या किमतीत मोठा दिलासा मिळाला आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे एप्रिलमध्ये तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात केली आहे. मात्र व्यावसायिक गॅस सिलेंडरवर ही कपात करण्यात आली आहे. 19 किलोचा एलपीजी सिलिंडर 32 रुपयांनी स्वस्त झाला आहे.
आजपासून नवे दर लागू झाले आहेत. आता राजधानी दिल्लीत 19 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 30.50 रुपयांनी कमी होऊन 1764.50 रुपये झाली आहे. मुंबईत एका सिलेंडरची किंमत 31.50 रुपयांनी कमी होऊन 1717.50 रुपये झाली आहे तर चेन्नईमध्ये 30.50 रुपयांनी कमी होऊन 1930 रुपये झाली आहे.
दरम्यान, घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. सरकारने घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात आज कोणताही बदल केलेला नाही. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरांचा विचार केला तर 14.2 किलोचा घरगुती LPG सिलेंडर दिल्लीत 803 रुपयांना, कोलकात्यात 829 रुपयां आणि मुंबईत 802.50 रुपयांमध्ये मिळत आहे.