School Summer Vacation
School Summer Vacation

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; ‘या’ तारखेपासून मिळणार उन्हाळी सुट्टी

Published by :
Published on

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना २ मे पासून उन्हाळी सुटी (Summer vacation) जाहीर करण्यात आली आहे. तसेच २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात शाळा १३ जूनपासून, तर विदर्भातील शाळा २७ जूनपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाने परिपत्रकाद्वारे दिली.

कोरोनामुळे अर्ध वर्ष कोविडमध्ये गेले होते. त्यात शाळा उशिरा सुरू झाल्याने अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षा घेण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. त्यानंतर उन्हाळी सुटीबाबत विद्यार्थी, पालक, शिक्षकांकडून प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यामुळे आता सोमवार दि. ०२ मे, २०२२ पासून उन्हाळी सुट्टी लागू करण्यात येणार आहे. सदर सुट्टीचा कालावधी रविवार दि. १२ जून, २०२२ पर्यंत ग्राह्य धरण्यात येऊन सन २०२२-२३ मध्ये पुढील शैक्षणिक वर्षात दुसरा सोमवार दि. १३ जून, २०२२ रोजी शाळा सुरू करण्यात येतील. तसेच जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टी नंतर तेथील शाळा चौथा सोमवार दि. २७ जून, २०२२ रोजी सुरू होतील.

राज्यातील पहिली ते नववी, अकरावीचा निकाल ३० एप्रिल रोजी किंवा त्यानंतरच्या सुटीच्या कालावधीत जाहीर करता येईल. मात्र तो निकाल विद्यार्थी, पालकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी संबंधित शाळेची राहील. शाळांतून उन्हाळ्याची आणि दिवाळीची दीर्घ सुटी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव किंवा नाताळ यांसारख्या सणांवेळी ती समायोजनाने संबंधित जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिकचे शिक्षण अधिकारी यांच्या परवानगीने घ्यावी. शैक्षणिक वर्षातील सुट्या एकूण ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com