Sangali Crime : अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार; स्थानिक आक्रमक, आरोपीच्या घराची तोडफोड
सांगलीतील संजयनगर भागात एका नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने आरोपी राहुल कांबळे याला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
28 वर्षीय तरुणाने 9 वर्षाच्या मुलीवर ब्ल्यू फिल्म दाखवून लैगिंक अत्याचार केला होता. त्यानंतर संजयनगर भागातील नागरिक संतप्त झाले होते. आरोपी तरुणास संजयनगर पोलिसांनी अटक करत आरोपींवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, यानंतर अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या घराची जमावाकडून तोडफोड करण्यात आली आहे. तसेच अत्याचार झालेल्या सार्वजनिक शौचालयाची देखील संतप्त झालेल्या जमावाने तोडफोड करण्यात आली आहे.
ही घटना ज्या ठिकाणी घडली त्या ठिकाणी काही गांजाची झाडे सुद्धा आढळून आले आहेत. अत्याचार करणारा आरोपी सुद्धा त्याच ठिकाणी गांजा ओढत बसतो, अशी माहिती स्थानिकांनी दिली. त्यामुळे महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयाचा परिसर हा गांजाचा अड्डा आणि गांजा निर्मिती केंद्र बनले आहे का? असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.