दिपाली सय्यद अन् राज्यपालांचे साटेलोटे; अनेकांना कोट्यवधींचा गंडा

दिपाली सय्यद अन् राज्यपालांचे साटेलोटे; अनेकांना कोट्यवधींचा गंडा

सांगली येथे पत्रकार परिषदेत दिपाली सय्यद यांच्यावर गंभीर आरोप
Published on

संजय देसाई | सांगली : अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी अनेक लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला. बोगस लग्न लावली. लग्न झालेल्या जोडप्यांची पुन्हा लग्न लावून सामुदायिक विवाह सोहळा दाखवला, असे आरोप दिपाली सय्यद यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांचा गंभीर आरोप केले आहेत. सांगली येथे भाऊसाहेब शिंदे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दिपाली सय्यद अन् राज्यपालांचे साटेलोटे; अनेकांना कोट्यवधींचा गंडा
कानडी बांधव आमचेच, पण...; संभाजीराजेंचा कर्नाटक सरकारला इशारा

भाऊसाहेब शिंदे म्हणाले की, दिपाली सय्यद यांनी अनेक लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. सामुदायिक विवाहाच्या नावाखाली बोगस लग्न लावली आहेत. लग्न झालेल्या जोडप्यांची पुन्हा लग्न लावून सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत लग्नात दिलेले सोने देखील बनावट आहेत. ज्यांची लग्न लावली त्या जोडप्यांना अपत्य आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि दिपाली सय्यद यांचे साटेलोटे आहेत, असे आरोप दीपाली सय्यद केले आहे.

दिपाली सय्यद अन् राज्यपालांचे साटेलोटे; अनेकांना कोट्यवधींचा गंडा
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद चिघळला! एकनाथ शिंदे म्हणाले, इथून पुढे...

दिपाली सय्यद ट्रस्टच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये हडपले. ट्रस्टच्या खात्यात फक्त 9 हजार, मग कोट्यवधी रुपये आणले कोठून आणि कोणाला दिले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

दिपाली सय्यद यांचे दुबई आणि पाकिस्तानातही कनेक्शन आहे. राज्यपाल यांना पदावरून लवकर हटवावे आणि आर्थिक गुन्हे शाखेने या ट्रस्टची चौकशी केली नाही. तर उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहन करण्याचा इशारा भाऊसाहेब शिंदे यांनी दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com