Rajya Sabha Election : हवेत उडणारे भाजपाचे विमान संध्याकाळी जमिनीवर येणार - भास्कर जाधव
राज्यसभेच्या (Rajya Sabha Election) सहा जागांसाठी आज (शुक्रवार) मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी राज्यात कमालीची चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीत शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, (Sanjay Raut) राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल, कॉंग्रेसचे इम्रान प्रतापगढी आणि भाजपचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल व डॉ. अनिल बोंडे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात थेट लढत होणार असून ही जागा निवडून आणण्यासाठी दोन्ही बाजूंकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
याचपार्श्वभूमीवर शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी भाजपवर आरोप केले आहेत. दरम्यान हवेत उडणारे भाजपाचं विमान संध्याकाळी जमिनीवर येणार. भाजपा नेत्यांच्या वक्तव्यांकडे लक्ष देण्याची गरज नाही. आपण पराभूत होणार आहोत, हे त्यांना माहिती असल्याने ते आरोप करत आहेत. असं शिवसेना नेते भास्कर जाधव म्हणाले आहेत.
तसेच बहुजन सारख्या छोट्या पक्षाचे आमदार सोडले तर सगळे आमदार इथे आले आहेत. तर काही आमदार हॉस्पिटल मधून आहेत. आमचे चारही उमेदवार जिंकून येतील असा विश्वास आम्हाला आहे. भाजपने अशांततेच वातावरण निर्णम करण्याचा प्रयत्न केला. काही आमदारांमध्ये असंतोष आहेत ती दूर होईल, असे यावेळी भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.