महाराष्ट्र
Bharati Pawar : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना कोरोनाची लागण
कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. बॉलिवूड सोबत राजकीय क्षेत्रात देखिल कोरोनाने विळखा घातला आहे. यातच आता केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharati Pawar) यांनाही कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. दोन दिवस नाशिक-मुंबई दौरा झाल्यानंतर डॉ. भारती पवार यांना त्रास जाणवू लागा. त्यामुळे त्यांनी कोरोनाची चाचणी केली. या चाचणीचा त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यापाठोपाठ खासदार हेमंत गोडसे यांचा अहवाल प्रथम पॉझिटिव्ह आला. त्यानंतर डॉ. भारती पवार यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.