महाराष्ट्र
मोर्चापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसराची बॉम्ब शोध पथकाकडून पाहणी
सर्व्वोच न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने महाराष्ट्रातील मराठा समाज अधिकच आक्रमक होताना दिसतोय . ५६ मोर्चा नंतर मराठा समाजाला आरक्षण मिळाले होते मात्र ते न्यायलयात टिकू शकले नाही. राज्यात कोरोनाची बिकट परीस्तीती असताना मराठा समाजाच्या आरक्षणावर कुर्हाड कोसळली.
त्यामुळे मराठा समाजाचे नेते आमदार विनायक मेटे यांनी सरकारवर निशाना साधत मराठा समाजाला मोर्चात सामील होण्याचे आव्हान केले . आज बीड मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे व अनेक इतर मागणीसाठी मोर्चाचे आयोजन केले व थोड्याच वेळात मोर्चालाही सुरवात होईल त्यामुळे बॉम्ब शोधक पथकाकडून छत्रपती शिवाज महाराज पुतळा या संपूर्ण परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे .तर कोठे घातपात घडू नये म्हणून प्रत्येक ठिकाणी तपासणी पथक वाढवून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कसून चौकशी केली जात आहे.