सरकारच्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून बीड जिल्ह्याचे नाव वगळले

सरकारच्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून बीड जिल्ह्याचे नाव वगळले

Published by :
Published on

विकास माने, बीड
बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालंय. अशातच शासनाचे अधिकारी पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर आले खरे, मात्र आजही जिल्ह्यातील शेतकरी मदतीपासून वंचितच आहे. असं असताना आता एसडीआरएफच्या (SDRF) सहायता निधीतून बीड जिल्ह्याचे नाव वगळण्यात आल्यानं शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जातोय,

बीड जिल्ह्यात खरीप हंगामात साडेसात लाख हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झालीय, सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली. तरीदेखील सध्या शेतकऱ्यांच्या पदरी अतिवृष्टीमुळे निराशाच आलीय. या परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांना मदत देणे गरजेचं होतं, परंतु एसडीआरएफ म्हणजेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून बीड जिल्ह्याचे नाव वगळण्यात आल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com