गुटखा तस्करी प्रकरण; आरोप सिद्ध झाल्यास राजकारणातून संन्यास घेईन – कुंडलिक खांडे
विकास माने, बीड | गुटखा प्रकरणात दोषी असलेले बीडचे शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी आज बीडमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. या पत्रकार परिषदेत दरम्यान त्यांनी आरोप सिद्ध झाल्यास कायमस्वरूपी राजकारणातून संन्यास घेईल असा दावा केला आहे.
केज पोलीस ठाणे हद्दीत आढळलेल्या गुटखा प्रकरणात शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणात शिवसेनेकडून त्यांच्या पदाला स्थगिती देण्यात आलीय. मात्र खांडे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले असून, न्यायालयाने कायमस्वरूपी क्लिनचीट दिली असल्याचे म्हटले आहे. पोलीस उपाधीक्षकांनी शिवसेनेला बदनाम करण्याची सुपारी घेतली असल्याचा आरोप यावेळी खांडे यांनी केलाय.
आरोप कोर्टात सिद्ध झाल्यास मी राजकारणातून संन्यास घेईल, कोणत्याही व्यासपीठावर येणार नाही. असा दावा देखील खांडे यांनी केलाय. तर दुसरीकडे जिल्हाप्रमुख पदासाठी जुन्या शिवसैनिकांनी लॉबिंग देखील सुरू केलीय. त्यामुळे आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार हेच पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.