Beed: बस प्रवासादरम्यान सराफा व्यापाराची अडीच किलो सोने ठेवलेली बॅग लंपास

Beed: बस प्रवासादरम्यान सराफा व्यापाराची अडीच किलो सोने ठेवलेली बॅग लंपास

बीड जवळील नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत एका व्यापाऱ्याचे दोन कोटीचे दागिने चोरट्यांनी बस मधून लंपास केले आहेत.
Published by :
shweta walge
Published on

बीड जवळील नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत एका व्यापाऱ्याचे दोन कोटीचे दागिने चोरट्यांनी बस मधून लंपास केले आहेत. नांदेडहून मुंबईकडे बसने जात असलेल्या सराफा व्यापाऱ्याचे प्रवासात दोन कोटी रुपयांचे दागिने चोरी गेले आहेत. घटना नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील एका धाब्याजवळ घडली असून याप्रकरणी नेकनुर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

नांदेडहून मुंबईकडे निघालेली बस एका धाब्यावर जेवणाकरिता थांबली होती. याच दरम्यान मुंबईतील सराफा व्यापारी रमेश जैन यांच्यावर पाळत ठेवून असणाऱ्या चोरट्याने त्यांची बॅग तेथून लंपास केलीय. ही बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ नेकनूर पोलिसांशी संपर्क साधला त्या बॅगमध्ये अडीच किलो पेक्षा अधिकचे सोने असल्याचा दावा संबंधित व्यक्तीने केला आहे. पोलिसांनी धाब्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका अज्ञात व्यक्तीने बॅग पसार केली असल्याचं स्पष्ट झाले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com