महाराष्ट्र
धक्कादायक! दारू पिण्यासाठी पान टपरी चालकाला पैशासाठी कोयत्याने मारहाण
Pune: दारु पिण्यासाठी पैसे नसल्याने पान टपरी चालकाला केली कोयत्याने मारहाण
पुणे: दारु पिण्यासाठी पैसे नसल्याने कोयता टोळीने पान टपरी चालकाला पैशासाठी कोयत्याने मारहाण केल्याची घटना हांडेवाडीत रॉयल सोसायटी जवळ घडली आहे.
अमर देशमाने, गणेश कोरडे आणि त्यांच्या इतर दोन साथीदारांनी टपरी चालकाला कोयत्याने मारहाण केली आहे. मारहाण सुरु असताना बचाव करण्यासाठी टपरी चालकाने त्यांच्याजवळ असलेलं गंज काढून केले स्वतःचे संरक्षण केले.
दारू पिण्यासाठी हडपसर परिसरातील असलेले हे आरोपी काल रात्री हंडेवाडी चौकात आले होते. चारही आरोपी विरोधात पुण्यातील विविध पोलीस स्थानकात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. ही महाराणी सुरू असताना लागलीच कोंढवा पोलीस स्टेशनची बीट मार्शल घटनास्थळावर जाऊन दोघा कोयता टोळीच्या सदस्यांना ताब्यात घेतले आहे.