Online वस्तू मागवताय तर सावधान!  
फ्लिपकार्टच्या कर्मचाऱ्यांचा प्रकार उघडकीस

Online वस्तू मागवताय तर सावधान! फ्लिपकार्टच्या कर्मचाऱ्यांचा प्रकार उघडकीस

फ्लिपकार्टवरुन वस्तू मागवताय तर सावधान कारण एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
Published by :
shweta walge
Published on

पुणे; फ्लिपकार्टवरुन वस्तू मागवताय तर सावधान कारण एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑनलाईन मागवलेल्या मोबाईलच्या पॅकिंग बॉक्समध्ये बंद पडलेला मोबाईल किंवा साबण ठेवून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचा प्रकार पुण्यातून समोर आला आहे.  विशेष म्हणजे फ्लिपकार्टचेच कर्मचारी गंडा घालत असल्याचं समोर आलं आहे.

फ्लिपकार्टच्या डिलिव्हरी बॉयची बेईमानी समोर आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केली चार जणांना अटक केली आहे. डिलिव्हरी देताना नवीन मोबाईल काढून घ्यायचे आणि त्याऐवजी दगड, गोटे, फरशीचे तुकडे ग्राहकांना द्यायचे. याचीतक्रार आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात अधिक तपास करत या कंपनीतील चार कर्मचाऱ्यांना अटक केली. या कारवाईमध्ये आरोपींच्या ताब्यातून ४.५ लाख रुपये किमतीचे विविध कंपनीचे १९ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com