सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीवर मराठा वसतिगृहाचं लावलं बॅनर
मराठा आरक्षणाचा विषय राज्यात पेटत असताना जालन्यात पालकमंत्र्यांनी मंजूर केलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीवर मराठा विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचं बॅनर लावण्यात आले.
तत्कालीन सरकारनं मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह मंजूर केले होते. मात्र आता त्याच ठिकाणी पालकमंत्री राजेश टोपे यांनी परतूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय हलवण्याचा निर्णय घेतला. मात्र मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी मंजूर झालेल्या इमारतीवर कोणीही ताबा करू नये. यासाठी अखिल मराठा महासंघाच्या वतीनं इमारतीवर मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचं बॅनर लावून नामांकरण करण्यात आले.
जर ही इमारत या इमारतीवर कोणी ताबा करण्याचा प्रयत्न केला तर त्याला मराठा महासंघाच्या वतीनं उत्तर देऊ असा इशारा यावेळी देण्यात आले. मराठा महासंघाने घेतलेल्या पवित्र्यावर शासन काय निर्णय घेते यावर सर्वांचे लक्ष आहे.