बंडातात्या कराडकर यांनी कीर्तनातून केला वाईन विक्रीचा निषेध
प्रशांत जगताप, सातारा | वाईन विक्री निर्णयावर वारकरी संप्रदायाचे जेष्ठ संत बंडातात्या कराडकर यांनी कीर्तनातून सरकारच्या वाईन विक्रीचा जाहीर निषेध केला. तसेच येत्या 3 फेब्रुवारीला "दंडवत-दंडुका आंदोलन" करून मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा दिला.
राज्य सरकारने घेतलेल्या किराणा आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निषेध ह.भ.प बंडातात्या कराडकर यांनी केला असून या विरोधात त्यांनी आणि व्यसनमुक्त युवक संघाने दंड थोपटले आहेत.
बंडातात्या कराडकर यांनी कीर्तनातून वाईन विक्रीचा निषेध केला असून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने साताऱ्यात येत्या 3 तारखेला पोवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे हातात एक मीटरची काठी घेऊन "दंडवत-दंडुका आंदोलन" करून मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती बंडातात्या कराडकर यांनी दिली आहे.
दरम्यान याआधी वाईन विक्री निर्णयावर वारकरी संप्रदायाचे जेष्ठ संत बंडातात्या कराडकर यांनी महाराष्ट्र सरकारला उपरोधिक टोले लगावले होते. आता शालेय पोषण आहार आणि मंदिरात देखील वाईन ठेवावी, असा टोला बंडातात्या कराडकर यांनी राज्य सरकारला लगावला.