महाराष्ट्र
पोलिसांची शिष्टाई… बंडातात्या कराडकरांचा पायी वारीचा निर्णय मागे
ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर आळंदीत वारीत दाखल होते. तसेच यावेळी नियम डावलून पायवारीला सुरुवात करण्यात आली. बंडातात्या जिथे दिसतील तिथून त्यांना ताब्यात घ्या, असे आदेश देण्यात आले होते.
असे असले तरी बंडातात्या हे वारीत सहभागी झाले होते. सर्व वारकऱ्यांनी आळंदी येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बंडातात्या कराडकर यांनी केल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती.
त्यानंतर आज ते स्वतः वारीत सहभागी झाले होते. मात्र पोलिसांच्या शिष्टाईनंतर बंडातात्या कराडकर यांनी पायी वारी करण्याचा निर्णय मागे घेतला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.