Balasaheb Thackeray Birth Anniversary : बाळासाहेब ठाकरे यांची जयंती; मुख्यमंत्री साधणार संवाद

Balasaheb Thackeray Birth Anniversary : बाळासाहेब ठाकरे यांची जयंती; मुख्यमंत्री साधणार संवाद

Published by :
Published on

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 23 जानेवारी रोजी जयंती यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच व्हिडिओ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत.

बाळासाहेब ठाकरे यांची जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मात्र, कोरोनाच्या सावटाखाली बाळासाहेबांची जयंती साधेपणाने साजरी केली जात आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त राज्यभरात शिवसैनिकांकडून विविध रक्तदान शिबिरे आणि इतर सार्वजनिक उपक्रम राबवले जातात.  व्यंगचित्रकार ते राजकीय नेते असा बाळासाहेब ठाकरे यांचा प्रवास आहे. १९६० साली त्यांनी फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातून राजीनामा दिला आणि स्वतःचे मार्मिक नावाचे व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केले. १९६६ साली बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली.

दरम्यान या निमित्ताने आज वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा आकर्षक अश्वारूढ पुतळ्याचे अनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरसिंगमाध्यमातून होणार आहे. या कार्यक्रमाला पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेसह मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत आदी शिवसेनेचे नेते उपस्थितीत राहणार आहेत. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com