सिल्व्हर ओक आंदोलन प्रकरण; 115 एसटी कर्मचा-यांचा जामीनासाठी अर्ज
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी हल्ल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एसटी कर्मचा-यांचा जामीनासाठी अर्ज केला आहे. 20 एप्रिलला मुंबई सत्र न्यायालयात या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.
8 एप्रिलला एसटी कर्मचारी अचानकपणे आज शरद पवार यांच्या निवास्थानाच्या आवारात शिरले. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत दगडफेक आणि चप्पलफेक देखील केली. शिवाय, शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडी सरकारविरोधता जोरदार घोषणाबाजी केली.
या सिल्व्हर ओकवरील आंदोलनानंतर वकिल गुणरत्न सदावर्ते यांना अटक कऱण्यात आली होती. तसेच 115 एसटी कर्मचाऱ्यांना देखील अटक करण्यात आली होता. न्यायालयीन कोठडीत असलेल्या एसटी कर्मचा-यांनी आता जामीनासाठी अर्ज केला आहे. 20 एप्रिलला मुंबई सत्र न्यायालयात या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.