Rajya Sabha Election: “मोदींशी बोलून तोडगा काढा, अन्यथा..." बच्चू कडूंचा ठाकरे सरकारला इशारा
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून या विषयावर तोडगा काढावा, अन्यथा आम्ही राज्यसभा निवडणुकीत मतदानाबाबत शेवटच्या पाच मिनिटांमध्ये निर्णय घेऊ, असा इशारा त्यांनी दिला.
तसेच “आमचे मतदान भाजपला जाणार नाही. मात्र, महाविकास आघाडीला देखील शेवटच्या पाच मिनिटांत मतदान करू. संपूर्ण महाराष्ट्रात हरभरा उत्पादकांची संख्या एक लाख तर धान उत्पादकांची संख्या चार ते पाच लाख आहे. केंद्र सरकार शेतमाल खरेदी करीत नाही. त्यामुळे त्यांनी एका हेक्टरला हजार रुपये मदत हरभरा आणि धान उत्पादकांना द्यायला पाहिजे. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि शरद पवार यांनी मोदींची भेट घेतली पाहिजे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने हालचाली कराव्यात”. असे बच्चू कडू यांनी सांगितले. सहाव्या जागेसाठी अपक्ष आमदारांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे असताना ऐनवेळी बच्चू कडू यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.