लस न घेता घराबाहेर फिराल, तर दंड! औरंगाबाद प्रशासनाचा प्रस्ताव
यापुढे लस न घेता घराबाहेर पडल्यास दंड आकारण्याचा प्रस्ताव औरंगाबाद प्रशासनाने मांडला आहे. त्यामुळे ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी हा मोठा निर्णय स्थानिक प्रशासन घेण्याची चित्र आहे. लवकरच यावर सुनावणी होणार असून दंड लावण्याचा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता बळावली आहे.
प्रशासनाच्या अनलॉक संदर्भातील निर्णयातील संभ्रमावस्था कायम आहे. यामुळे औरंगाबादमध्ये आज पूर्ण क्षमतेने दुकानं उघडण्यात आली होती. यामुळे बाजारातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे चित्र होते. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने वाहनांच्या रांगाही लागल्या. यामुळे रस्ते तुडूंब भरले होते.
औरंगाबादमधील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अखेर स्थानिक प्रशासनाने कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत लस न घेता बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात प्रस्ताव समोर आला आहे.