वसई विरार शहराच्या पाणीपुरवठ्याचे लेखापरिक्षण; पालकमंत्र्यांनी दिले आदेश

वसई विरार शहराच्या पाणीपुरवठ्याचे लेखापरिक्षण; पालकमंत्र्यांनी दिले आदेश

Published by :
Published on

वसई – विरार | वसई विरार शहराची लोकसंख्या २५ लाखांहून अधिक आहे. शहराला दररोज २०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. त्यात १२० दशलक्ष लिटर पाण्याची तूट भेडसावत असते.

सदोष वितरण व्यवस्था, ठीकठिकाणी होत असलेली पाण्याची गळती, पाणीचोरी, वारंवार जलवाहिन्या फुटणे आदी प्रकारांमुळे पाणीटंचाईत भर पडली आहे. अनेक ठिकाणी एक दिवसाआड पाणीपुरवठा होतो. तर अनेक ठिकाणी ३ ते ४ दिवसांनी पाणी येते.यामुळे शहराच्या संपूर्ण पाणीपुरवठा योजनेचे लेखापरीक्षण करावे अशी मागणी माजी स्थायी सभापती सुदेश चौधरी आणि माजी शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण यांनी पालकमंत्री दाद भुसे यांच्याकडे केली होती.

या तक्रारीच्या अनुषंगाने पालकमंत्र्यांनी पालिकेला पाणीपुरवठा योजनेचे लेखापरीक्षण करून एक महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. वसई विरार शहरातील पाणीटंचाई आणि त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय याची दखल पालकमंत्री दादा भुसे यांनी घेतली आहे.शहराच्या पाण्याचे नियोजन आणि एकंदरीत पाणी समस्येच्या आढावा घेण्यासाठी पाण्याचे लेखापरीक्षण करण्याचे आदेश पालकमंत्री भुसे यांनी दिले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com